बालमटाकळीला तिसऱ्यांदा विमाग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:11+5:302021-03-15T04:20:11+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी गावाला नुकताच एलआयसीकडून देण्यात येणारा विमाग्राम पुरस्कार मिळाला आहे. तिसऱ्यांदा हा पुरस्कार गावास मिळत ...

बालमटाकळीला तिसऱ्यांदा विमाग्राम पुरस्कार
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी गावाला नुकताच एलआयसीकडून देण्यात येणारा विमाग्राम पुरस्कार मिळाला आहे. तिसऱ्यांदा हा पुरस्कार गावास मिळत असून बुधवारी या पुरस्कारासाठीचा एक लाख रुपयांचा धनादेश वितरण सोहळा पार पडला.
बालमटाकळी येथे एलआयसीचे शेवगाव शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी श्रीनिवास डंके, उपसरपंच तुषार वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश वितरण करण्यात आले. विमाग्राम पुरस्कार सलग तीन वर्षे गावाला मिळत असून हे गावासाठी अभिमानास्पद आहे. यासाठी एलआयसीचे विमा प्रतिनिधी जालिंदर जाधव यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे वैद्य यांनी याप्रसंगी म्हटले.
यावेळी चंद्रकांत गरड, रंगनाथ वैद्य, धनंजय देशमुख, माणिक कवडे, तलाठी बाबासाहेब आंधारे, ग्रामसेवक आप्पासाहेब मस्के, रामजी सौन्दर, बाळासाहेब दोडके, प्रभाकर वाघुंबरे, हरिभाऊ वैद्य, दामोदर वैद्य, गंगाधर सोनवणे, राजेंद्र घाडगे, राजेंद्र शिंदे, जयराम देवढे, वैजनाथ सुरवसे, भास्कर पटवेकर, बाळासाहेब जाधव, रमेश वैद्य, नंदू पोकळे, वाघुंबरे गुरुजी, लखीचंद जगताप, हरिचंद्र घाडगे, किरण पाथरकर, रामचंद्र जाधव, कचरू बावणे, ऋषिकेश मानूरकर, विजय कांकरिया, विमा प्रतिनिधी ताराचंद शेळके, कृष्णा देशमुख, सुरेश काजवे, ग्रामपंचायत कर्मचारी सतीश खेळकर, एकनाथ शिंदे, मेहबूब शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन निलेश दौंड यांनी केले. प्रास्ताविक जालिंदर जाधव यांनी केले तर विमा प्रतिनिधी सुभाष फुंदे यांनी आभार मानले.
-- १४ बालमटाकळी
बालमटाकळी येथे एलआयसीच्या विमाग्राम पुरस्काराचा धनादेश स्वीकारताना उपसरपंच तुषार वैद्य, धनंजय देशमुख, रामजी सौंदर, माणिक कवडे व इतर.