सेनापदक मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी केला जवानाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:18 IST2021-01-18T04:18:30+5:302021-01-18T04:18:30+5:30

१५ जानेवारी रोजी सेना दिवसाचे औचित्य साधून भारतीय सेनाप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील करिअप्पा परेड ...

The villagers felicitated the soldier for receiving the Army Medal | सेनापदक मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी केला जवानाचा सत्कार

सेनापदक मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी केला जवानाचा सत्कार

१५ जानेवारी रोजी सेना दिवसाचे औचित्य साधून भारतीय सेनाप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील करिअप्पा परेड ग्राउंडवर त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हवालदार विकास पवार नुकतेच गावी आले असून, डोंगरगणचे सरपंच कैलास पटारे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी राधाकिसन भूतकर, अण्णासाहेब मते, बाबुराव दाणी, विलास खेत्री, दत्तात्रय खेत्री, मोहन खंडागळे, रखमाजी खंडागळे, साहेबराव मते, शंकर चांदणे, सर्जेराव शिरसाठ, मच्छिंद्र झरेकर, बाबासाहेब वाघमारे उपस्थित होते. डिसेंबर २०१९ या काळात हवालदार विकास पवार जम्मू आणि काश्मीर येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत असताना त्यांनी पाच जवानांच्या टीमचे नेतृत्व करत सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हवालदार विकास पवार यांचे वडील व आजोबा यांनीदेखील भारतीय सैन्यदलात सेवा केली आहे.

.....

मागील सतरा वर्षांपासून देशसेवेत असून, सेना पदक मिळाल्यामुळे या सेवेचे चीज झाले आहे. माझ्या ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराने भारावून गेलो असून, यापुढे देशसेवा करण्यासाठी आणखी बळ मिळेल.

-विकास पवार, हवालदार, सैन्यदल.

फोटो‌‌ - १७ विकास पवार सत्कार

...

ओळी : डोंगरगण येथील भारतीय सैन्य दलातील हवालदार विकास पवार यांना सेनापदक मिळाल्याबद्दल डोंगरगण ग्रामस्थांनी सत्कार केला.

Web Title: The villagers felicitated the soldier for receiving the Army Medal