तरुणाच्या अपहरणप्रकरणी ग्रामस्थ संतप्त
By Admin | Updated: August 17, 2016 00:45 IST2016-08-17T00:32:59+5:302016-08-17T00:45:48+5:30
राहुरी : वांबोरी फाटा येथून अपहरण झालेल्या युवकाचा शोध न लागल्याने संतप्त नागरिकांनी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ तसेच पोलीस

तरुणाच्या अपहरणप्रकरणी ग्रामस्थ संतप्त
राहुरी : वांबोरी फाटा येथून अपहरण झालेल्या युवकाचा शोध न लागल्याने संतप्त नागरिकांनी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ तसेच पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले़ दोन दिवसात तपास न लागल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला़
राहुरी येथील राजूभाऊ शेटे यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी मंगळवारी सभा झाली़ या सभेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मोर्चाने तहसील कचेरीवर जाऊन नायब तहसीलदार वैशाली गुंजाळ, पोलीस उपनिरिक्षक बालाजी श्ोंगेपल्लू, महावीर जाधव यांना निवेदन दिले़ गुन्हेगारांना अटक करा अन्यथा जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला़
सभेत बोलताना बारागाव नांदुर येथील सिंधुताई पवार म्हणाल्या, राहुरी तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे़ न्याय मिळत नसेल तर भव्य मोर्चा व जेलभरो आंदोलन छेडू़ शिलाताई देशमुख म्हणाल्या, मुलींच्या छेडाछाडीचे प्रकार वाढले आहे़ पोलिसांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे़ पोलिसांना बंदोबस्त करता येणे शक्य नसेल तर महिला कायदा हातात घेतील़ यावेळी संजीव भोर, राजूभाऊ शेटे, अॅड़ राहुल शेटे, सरपंच सचिन शिंदे, देवेंद्र लांबे, भरत धोत्रे, शेख, शाम गोसावी यांची भाषणे झाली़ (तालुका प्रतिनिधी)