विधानसभा निवडणूक निकाल : संगमनेरातून बाळासाहेब थोरात ६२ हजार मतांनी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 14:12 IST2019-10-24T14:12:07+5:302019-10-24T14:12:53+5:30
काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून ६२ हजार मतांनी विजय मिळविला आहे़. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे़.

विधानसभा निवडणूक निकाल : संगमनेरातून बाळासाहेब थोरात ६२ हजार मतांनी विजयी
संगमनेर : काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून ६२ हजार मतांनी विजय मिळविला आहे़. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे़.
थोरात यांच्या विरोधात उद्योजक साहेबराव नवले यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती़. नवले यांनी थोरात यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता़. गावोगाव सभा, मेळावे घेत त्यांनी थोरातांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला़. थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे ते मतदारसंघात कमी अन् इतर उमेदवारांच्या प्रचारातच जास्त राहिले़ थोरात यांनी राज्यभरात ६० पेक्षा अधिक सभा घेतल्या होत्या़. त्यामुळे नवले हे कडवी झुंज देतील, असे बोलले जात होते़. मात्र, पहिल्या फेरीपासूनच थोरातांनी घेतलेली आघाडी कायम टिकवली़. अखेरीस थोरातांनी विजय मिळविला़ निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही़. मात्र, मतमोजणीतील कल पाहता थोरात विजयी झाल्याचे दिसत आहे़.