Video : ...जेव्हा मिरवणुकीसाठी आणलेला हत्ती पाण्यात ठिय्या मांडतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 14:15 IST2018-04-10T14:13:49+5:302018-04-10T14:15:55+5:30
हत्तीला पाण्यातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न

Video : ...जेव्हा मिरवणुकीसाठी आणलेला हत्ती पाण्यात ठिय्या मांडतो
अहमदनगर : अकोले येथील खंडोबा मंदिराची खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीनं शहराजवळील नदीच्या पाण्यात ठिय्या मांडून बसल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यामुळे सकाळी 7 वाजता सुरू होणारी मिरवणूक लांबणीवर पडले. तब्बल 5 तास हत्तीनं पाण्यात ठिय्या मांडला होता. मंगळवारची (10 एप्रिल) ही घटना आहे.
मिरवणूक सोहळा सुरू होण्यापूर्वी सकाळी हत्तीला आंघोळीसाठी प्रवरा नदीपात्रात आणण्यात आले होते. वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या हत्तीनं थेट नदीत प्रवेश केला व तब्बल पाच तास तो पाण्याबाहेर पडलाच नाही. हत्तीला बाहेर काढण्यासाठी मालकानं प्रचंड शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, पाच तासांपासून मिरवणूक खोळंबल्यानं अखेर घोडे व उंट यांसह मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.