अभियंता दिनानिमित्त विकी घायतडक यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:51+5:302021-09-17T04:26:51+5:30
जामखेड : अभियंता दिनानिमित्त दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा. विकी घायतडक, सर्व शिक्षक यांचा ...

अभियंता दिनानिमित्त विकी घायतडक यांचा सन्मान
जामखेड : अभियंता दिनानिमित्त दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा. विकी घायतडक, सर्व शिक्षक यांचा आदर्श अभियंता म्हणून रेणुकामाता मल्टिस्टेटच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सॅनिटायझर व मास्कचे किट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संदीप वराट, राजकुमार देशमुख यांनी प्रा. रणजित भालशंकर, प्रा. किशोर हुंबे, प्रा. सागर गांधी, पूजा पाटील, संतोष जगताप, प्रतीक उदारे, विक्रम कुटे, अधीक्षक संतोष डहाळे, सविता सुतार यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. यावेळी विस्तार अधिकारी विजय सुळे, दीपक सदाफुले आदी उपस्थित होते.
150921\17261739-img-20210915-wa0026.jpg
( फोटो - इंजिनीअर कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक यांना आदर्श अभियंता पुरस्कार मिळाला त्यांचा सत्कार श्री रेणुकामाता मल्टिस्टेटचे मॅनेजर वराट यांनी सन्मान केला)