महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST2021-03-04T04:37:43+5:302021-03-04T04:37:43+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील डोमेग्राम (कमालपूर) येथील अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आचार्य महंत नागराज बाबा (वय ६९) यांचे प्रदीर्घ ...

महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष
श्रीरामपूर : तालुक्यातील डोमेग्राम (कमालपूर) येथील अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आचार्य महंत नागराज बाबा (वय ६९) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
नागराजबाबा यांनी १९७८ मध्ये भारती विद्यापीठाची संस्कृत शास्त्री ही पदवी संपादन केली होती. पुरोगामी व्यक्तिमत्त्व असलेले नागराजबाबा यांना साहित्य, शिक्षण, समाजकारण, अध्यात्म व महानुभाव पंथीय कार्याची सखोल अभ्यास होता. त्यांनी महानुभाव पंथाच्या प्रचारास्तव महाराष्ट्राबरोबरच जम्मू-काश्मीर, गुजरात, कलकत्ता, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यात प्रवास केला. डोमेग्राम (कमालपूर) येथे भारतातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी सुसज्ज महानुभाव आश्रमाची निर्मिती व भव्य असे गुंफा मंदिर उभारणीसाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले. त्यांनी १९९९ मध्ये महानुभवीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.
डोमेग्राम येथील महातीर्थराज गुंफास्थान, महानुभाव आश्रम तसेच औरंगाबाद येथे श्रीकृष्ण मंदिर, महानुभाव आश्रम, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय याची जबाबदारी ते सांभाळत होते. त्यांच्या निधनाने महानुभाव पंथीयांसह सर्वच समाजाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह कमालपूर व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने दु:ख व्यक्त करण्यात आले. आचार्य नागराजबाबा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी डोमेग्राम येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
--------
नागराजबाबा