...असे झाले कुलगुरू ‘क्वारंटाईन’; अमेरिका दौरा : निगेटिव्ह आल्यानंतर घरी निगराणीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 13:15 IST2020-03-20T13:14:35+5:302020-03-20T13:15:35+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरराज्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू अमेरिका दौ-याहून परतल्यानंतर स्वत: क्वारंटाईन होण्याऐवजी अनेकांना भेटले. अखेर जिल्हा प्रशासनाने त्यांचा शोध घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. जेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तेव्हा त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु घरीही ते प्रशासनाच्या निगराणीखाली आहेत.

...असे झाले कुलगुरू ‘क्वारंटाईन’; अमेरिका दौरा : निगेटिव्ह आल्यानंतर घरी निगराणीखाली
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरराज्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू अमेरिका दौ-याहून परतल्यानंतर स्वत: क्वारंटाईन होण्याऐवजी अनेकांना भेटले. अखेर जिल्हा प्रशासनाने त्यांचा शोध घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. जेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तेव्हा त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु घरीही ते प्रशासनाच्या निगराणीखाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एका कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व त्यांचे अधिष्ठाता हे दोघे अमेरिकेतून एका परिषदेला उपस्थित राहून मंगळवारी परतले. भारतात परतल्यावर त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले होते. असे असूनही या दोघांनी मुंबई ते पुणे आणि पुणे ते नगर असा प्रवास केला. त्यानंतर त्यांच्या विद्यापीठातही त्यांनी काही बैठका घेतल्या. दरम्यान नगर जिल्हा प्रशासनाला परदेशातून आलेल्या या दोघांची माहिती मिळाली. जिल्हा प्रशासनाने त्यांना क्वारंटाईन होण्याची विनंती केली. मात्र कुलगुरूंनी ती गांभीर्याने घेतली नाही. शेवटी जिल्हा प्रशासनाला आपला अधिकार वापरत त्यांना क्वारंटाईन करावे लागले. त्या दोघांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. जेव्हा हे अहवाल निगेटिव्ह आले. तेव्हा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. आता हे कुलगुरू व अधिष्ठाता ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये असल्याचे समजते.