प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विष्णू मगरे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:18+5:302021-06-09T04:27:18+5:30
प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज हे निवृत्त झाल्यानंतर यांच्या जागी पुढील ...

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विष्णू मगरे यांची निवड
प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज हे निवृत्त झाल्यानंतर यांच्या जागी पुढील पाच वर्षांसाठी कुलगुरू म्हणून डॉ. विष्णू मगरे यांची निवड झाली. मावळते कुलगुरू डॉ. जयराज यांची मुख्य सल्लागार म्हणून निवड करण्यात आल्याचे बैठकीत डॉ. विखे पाटील यांनी जाहीर केले. यावेळी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजवीर भलवार, पंजाबराव आहेर, डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र मनिरेकर, डॉ. नीरजकुमार, डॉ. शिवबालन, डॉ. सोमसुंदरम, डॉ. संपत वाळुंज, डॉ. सोनाली दास उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी, डॉ. जयराज यांचे प्रवरा आरोग्य विद्यापीठातील योगदान हे आम्हास दिशादर्शक राहील. डॉ. जयराज जरी निवृत्त झाले तरी प्रवरा परिवाराचे सदस्य म्हणून कायम राहणार आहेत. तसेच आपल्या परिवातील नवीन सदस्य कुलगुरू डॉ. मगरे यांचे मार्गदर्शन लाभेल, असे सांगितले.
डॉ. मगरे यांनी मी प्रवरा विद्यापीठाच्या प्रतिष्ठा आणि प्रगतीसाठी कार्य करेल. तसेच पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचाराच्या मार्गाने जाण्याचा माझा प्रयत्न राहील, असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. राहुल कुंकूलोळ यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. संपत वाळुंज यांनी मानले.
--------
फोटो आहे
070621\img-20210607-wa0118.jpg
कुलगुरूपदी डॉ. विष्णु मगरे यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील हे सत्कार करताना