कारवाई सुरू करताच वाहने गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:45+5:302021-07-28T04:22:45+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यांवरील नादुरुस्त वाहने उचलण्याची कारवाई मंगळवारी सुरू केली. कारवाईसाठी पथक दाखल होताच, नागरिकांनी स्वत:हून ...

कारवाई सुरू करताच वाहने गायब
अहमदनगर : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यांवरील नादुरुस्त वाहने उचलण्याची कारवाई मंगळवारी सुरू केली. कारवाईसाठी पथक दाखल होताच, नागरिकांनी स्वत:हून वाहने काढून घेत, रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.
महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने नेहरू पुतळा येथील रस्त्यात उभी केलेली वाहने जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली. अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, अतिक्रमण विभागप्रमुख के.वाय. बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख यांच्यासह मोठा फाैजफाटा येथील लालटाकी येथे दाखल झाला. या चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जुनी वाहने उभी करण्यात आलेली होती. ही वाहने नागरिकांनी स्वत:हून काढून घेत रस्ता मोकळा केला. जुन्या कोर्ट परिसरातील रस्त्यावरही वाहने उभी करण्यात आलेली होती. तेथे मनपाचे पथक दाखल झाले. या पथकाने कारवाईला सुरुवात करताच, नागरिकांनी धावत पळत येऊन वाहने काढून घेतली. दिवसभरात विविध मार्गांवरील ३० वाहने नागरिकांनी स्वत:हून काढून घेतली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरातील रस्ते जुनी वाहने उभी केल्याने अरुंद झाले आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, तसेच वाहने उभी असलेल्या भागात स्वच्छता होत नाही. त्यामुळे नगरविकास खात्याने रस्त्यात उभी असलेली जुनी नादुरुस्त वाहने जप्त करण्याचा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी करत, महापालिकेने रस्त्यातील वाहने जप्त करण्याची मोहीम उघडली आहे. वाहने स्वत:हून काढून घेण्यासाठी मुदत देण्यात येते. दिलेल्या मुदत वाहने काढून न घेतल्यास ते जप्त करण्यात येत असून, वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
....
वाहनाचा धक्का, चालकास मारहाण
महापालिकेने कारवाईच्या दरम्यान नादुरुस्त वाहने उचलण्यासाठी टोइंग वाहन भाडेतत्त्वावर घेतले आहे. चारचाकी ओत्न आणत असताना मशीनचा धक्का बसून वाहनाचे नुकसान झाले. त्यामुळे वाहन चालकाने टोइंग मशीन चालकास मारहाण केली. त्यामुळे कारवाई काही वेळासाठी थांबविण्यात आली होती.
...
सूचना : फोटो- २७ पठारे नावाने आहे.