गव्हाणेवाडी नाक्यावर वाहनाची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:22 IST2021-05-09T04:22:01+5:302021-05-09T04:22:01+5:30

ढवळगाव : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता श्रीगोंदा तालुक्यातील नगर-पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी येथे तपासणी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या ...

Vehicle inspection at Gawhanewadi Naka | गव्हाणेवाडी नाक्यावर वाहनाची तपासणी

गव्हाणेवाडी नाक्यावर वाहनाची तपासणी

ढवळगाव : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता श्रीगोंदा तालुक्यातील नगर-पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी येथे तपासणी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या बेलवंडी पोलीस प्रशासनाची कडक कार्यवाही सुरू केली आहे. पुण्याकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करताना ई-पास घेतलेले आहेत का? मास्क लावले आहे का? विनाकारण कोण फिरत आहे का? याची खातरजमा केली जाते. तसे नसेल तर दंडात्मक कार्यवाही म्हणून पावती केली जात आहे. विनामास्क विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनाही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. बेलवंडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, हेड कॉन्स्टेबल एम. एल. सुरवसे, पी. बी. ठोकळ, संपत गुंड, होमगार्ड सचिन काळाणे, सचिन कोरडकर, अक्षय गायकवाड, संतोष लगड आदी बंदोबस्तावर आहेत.

Web Title: Vehicle inspection at Gawhanewadi Naka