एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:05+5:302021-02-05T06:38:05+5:30
एकदंत गणेश जन्मोत्सव १५ फेब्रुवारी रोजी आहे. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती उत्सवास प्रारंभ होईल. १३ फेब्रुवारी रोजी ...

एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
एकदंत गणेश जन्मोत्सव १५ फेब्रुवारी रोजी आहे. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती उत्सवास प्रारंभ होईल. १३ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषधे वाटप तसेच दंतरोग तपासणी, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर होईल. १४ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीर, रात्री एकदंत महिला मंडळ व परिवाराच्या वतीने हळदी कुंकू समारंभ, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम (बत्कम्मा) होईल. गणेश जयंतीदिनी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९ श्री विघ्नेश्वर पूजन व श्री गणपती अथर्वशीर्ष नाममूर्ती अभिषेक, सकाळी ९ ते साडेदहा होमहवन, त्यानंतर श्री सत्यनाराण महापूजा, दुपारी सामुदायिक विवाह, महाप्रसाद, दुपारी चार ते सायंकाळी सात यावेळेत लहान बालकांसाठी गंमत जंमत व बालमेळावा असे कार्यक्रम होतील.