व्हॅलेंटाईन डे निमित्त जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:44+5:302021-02-15T04:19:44+5:30

उपस्थितांनी शहीद भगतसिंग पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रा.सुनील ...

Valentine's Day message to destroy racism | व्हॅलेंटाईन डे निमित्त जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश

व्हॅलेंटाईन डे निमित्त जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश

उपस्थितांनी शहीद भगतसिंग पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रा.सुनील पंडित, हरजितसिंग वधवा, अर्षद शेख व डेव्हिड चांदेकर यांच्या हाती तिरंगा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.

मुळे म्हणाले, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम व्यक्त करायचेच असेल, तर आपल्या देशावर प्रेम वक्त करा. सध्या जातीयवादाची कीड वाढत आहे. शहीद भगतसिंग यांनी देशावर प्रेम व्यक्त करत आपल्याला स्वतंत्र्य मिळवून दिले. त्यांचा आदर्श घेऊन हम सब है भाई भाई.... या संकल्पनेने देशावर प्रेम व्यक्त करून एकत्रितपणे या जातीयवादाला समूळ नष्ट करू, असे आवाहन त्यांनी केले. प्रा.सुनील पंडित, अर्षद शेख यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांनी एक राहण्याचे आवाहन केले. यावेळी जागरूक नागरिक मंचाच्या सुरेखा सांगळे, शारदा होशिंग, मेहरुदा शेख, प्रा.मंगेश जोशी, अभय गुंदेचा, कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, बाळासाहेब भुजबळ, बी.यू.कुलकर्णी, योगेश गणगले, सुनील कुलकर्णी, जय मुनोत, अमेय मुळे, प्रसाद कुकडे, राजेश सटाणकर, प्रकाश भंडारे आदी उपस्थित होते.

फोटो - १४ उपक्रम

ओळी- व्हॅलेंटाईन डे निमित्त जागरूक नागरिक मंचाच्या वतीने जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश देत अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

Web Title: Valentine's Day message to destroy racism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.