आता प्राथमिक आरोग्य केंद्रांतही सुरू होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:30+5:302021-03-06T04:20:30+5:30
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून १४ ग्रामीण रुग्णालये व ८ मनपाच्या रुग्णालयांत कोरोना लसीकरण सुरू झाले असून त्यात आरोग्य, महसूल, ...

आता प्राथमिक आरोग्य केंद्रांतही सुरू होणार लसीकरण
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून १४ ग्रामीण रुग्णालये व ८ मनपाच्या रुग्णालयांत कोरोना लसीकरण सुरू झाले असून त्यात आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. शासकीय रुग्णालयांत ही लस मोफत तर खासगी रुग्णालयांत २५० रुपयांना मिळत आहे.
लसीकरणास वाढता प्रतिसाद लक्षात घेता आता जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतही लसीकरण सुरू करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे. सोमवारपासून या केंद्रांवर लसीकरण होणार आहे. दुर्गम भागातील केंद्रावर इंटरनेटची सुविधा नसल्याने तेथे लसीकरणास काही अडचणी येतील. मात्र, उर्वरित बहुतांश केंद्रांवर सोमवारपासून लसीकरण सुरू होणार आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस हे लसीकरण सुरू राहील.
-----------