संगमनेरातील क्रीडा संकुलात लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:19+5:302021-05-18T04:21:19+5:30
लसीकरण केंद्राचा शुभारंभ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश ...

संगमनेरातील क्रीडा संकुलात लसीकरण केंद्र
लसीकरण केंद्राचा शुभारंभ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, नगरसेवक गजेंद्र अभंग, नितीन अभंग, किशोर टोकसे, राजेंद्र वाकचौरे, कुंदन लहामगे, किशोर पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे हे सर्वांसमोर आव्हान आहे. शहरात प्रभागनिहाय आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. कोरोना व कोरोना सदृश आजारांची लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात पॉझिटिव्ह आलेल्यांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे आता शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. प्रत्येकाने घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक आहे.
-----------
संगमनेर शहरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. आपल्याला शहर पूर्णपणे कोरोनामुक्त करायचे आहे. यासाठी प्रत्येकाने स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी. शहरात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात ४५ वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून जशी लस उपलब्ध होईल, तसे लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदवावे.
-दुर्गा तांबे, नगराध्यक्षा, संगमनेर नगरपरिषद, संगमनेर
-------------