लस घेण्यासाठी आवाहनाचे फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:25+5:302021-04-18T04:20:25+5:30
दहिगाव बोलका : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गावात आवाहनाचे फलक लावले आहेत. दिवसेंदिवस कोरोना आपले हातपाय पसरत आहे. ग्रामीण ...

लस घेण्यासाठी आवाहनाचे फलक
दहिगाव बोलका : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गावात आवाहनाचे फलक लावले आहेत. दिवसेंदिवस कोरोना आपले हातपाय पसरत आहे. ग्रामीण भागही याला आता अपवाद राहिलेला नाही. कोरोनापासूनच्या बचावासाठी शासनाने
४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन विविध माध्यमांतून केले जात आहे. लोकांना जागरूक करून त्यांचे प्रबोधन करण्याची गरज येथील एका खाजगी औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या लक्षात आली. यासाठी लसीबाबत जागृती करण्यासाठी व गैरसमज दूर करण्यासाठी फ्लेक्स बोर्ड लावण्याचे कंपनीने ठरविले. त्याप्रमाणे गावात सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कंपनीने हे फ्लेक्स बोर्ड लावले आहेत.
.......................
ईश्वरदास पंडित यांची निवड
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील ईश्वरदास भगवान पंडित यांची केंद्रीय पोलीस दलात (सीआरपीएफ) नुकतीच निवड झाली. ते आपल्या सेवेत रुजू झाले आहेत. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण देवळाली प्रवरा येथे झाले. ते अतिशय मेहनती व हुशार विद्यार्थी होते. त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
....................
विनामास्क आढळल्यास कारवाई करणार
चांंदेकसारे : ग्रामस्थांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा. गावात विनामास्क फिरल्यास पंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्राम कोरोना सुरक्षा समितीचे अध्यक्ष सरपंच रामदास जाधव यांनी घारी ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत दिला. बैठकीस चांदेकसारे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रप्रमुख नागरे, सुपरवायझर मोरे, ग्रामसेवक जालिंदर पाडेकर, पोलीस पाटील मीराताई रोकडे, यमाजी पवार, उत्तम पवार उपस्थित होते.
.................
सुरेश देशमुख यांचे निधन
अकोले : सुगाव बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश गंगाधर देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. प्रमोद देशमुख यांचे वडील तर अगस्ती कारखान्याचे शेतकी विभागातील सुनील देशमुख व पालघरचे अप्पर जिल्हाधिकारी सतीश देशमुख यांचे ज्येष्ठ बंधू होते.