नवनागापूर येथे १५० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:47+5:302021-06-05T04:15:47+5:30
अहमदनगर : नवनागापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी (दि. ४) १५० जणांचे लसीकरण करण्यात आले. येथील ज्येष्ठ ...

नवनागापूर येथे १५० जणांचे लसीकरण
अहमदनगर : नवनागापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी (दि. ४) १५० जणांचे लसीकरण करण्यात आले. येथील ज्येष्ठ नागरिक ताराबाई सप्रे (वय ८४) यांना प्रथम डोस देऊन लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.
नवनागापूर ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी सकाळी १० वाजता लसीकरणास प्रारंभ झाला. यावेळी सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. के. एन. पोहरे, ग्रामपंचायत सदस्य सागर सप्रे, दीपक गिते, संजय चव्हाण, धनराज सप्रे, अक्षय पिसे, नरेश शेळके, ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ आदी उपस्थित होते.
लसीकरणासाठी जिल्हा परिषद शाळेत नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी दहा वाजता सुरु झालेले लसीकरण दुपारपर्यंत सुरु होते. ४५ वर्ष वयापुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच ज्यांनी पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत, अशा नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. एकूण १५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांनी सांगितली.
...............
०४ नवनागापूर व्हॅक्सीन
नवनागापूर येथे ज्येष्ठ नागरिक ताराबाई सप्रे यांना लस देऊन लसीकरणाचा प्रारंभ करताना वैद्यकीय अधिकारी के. एन. पोहरे. समवेत सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य सागरभाऊ सप्रे, संजय चव्हाण, संजय मिसाळ, धनराज सप्रे, अक्षय पिसे, नरेश शेळके आदी.