हमाल, माथाडी कामगारांना लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:34+5:302021-05-01T04:19:34+5:30
याबाबत शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, माथाडी ...

हमाल, माथाडी कामगारांना लस द्या
याबाबत शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, माथाडी कामगार हा शेतकरी व व्यापाऱ्यांचा महत्त्वाचा दुवा आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील विविध बाजार समित्या, भुसार मार्केट, रेल्वे मालधक्का, वखार महामंडळ, किराणा बाजार, ट्रान्सपोर्ट, शासकीय धान्य गुदामे, विविध कारखाने आदींसह अत्यावश्यक सेवा म्हणून सहा हजार कामगार नियमित काम करत आहेत. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षभरापासून हमाल, माथाडी कामगार जोखीम पत्कारून काम करत आहे. अनेक कामगार व त्यांचे कुटुंबीय कोरोनाने बाधित झाले आहेत. त्यामधील काहींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. यासाठी नगर शहरामध्ये हमाल पंचायतीचा दवाखाना असून, या ठिकाणी ताबडतोब लसीकरण केंद्र सुरू करावे त्याच बरोबर जिल्ह्यातही लसीकरण केंद्र हमाल माथाडी कामगारांसाठी सुरू करावे. येत्या आठ दिवसांमध्ये लसीकरण केंद्र सुरू न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.