भि. ग. रोहमारे राज्यस्तरीय ग्रामीण पुरस्काराचे वितरण
By | Updated: December 9, 2020 04:15 IST2020-12-09T04:15:43+5:302020-12-09T04:15:43+5:30
कोपरगाव : शहरातील स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय भि. ...

भि. ग. रोहमारे राज्यस्तरीय ग्रामीण पुरस्काराचे वितरण
कोपरगाव : शहरातील स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण सोमवारी (दि.७) पार पडले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक सुभाष महाजन होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. श्रीकांत बेडेकर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थित लेखक व मान्यवरांचे स्वागत केले. पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे यांनी पुरस्कृत लेखक व कवी यांच्या साहित्यकृतींचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त लेखक प्रवीण बांदेकर (इंडियन ऍनिमल फार्म, ग्रामीण कादंबरी), प्रभाकर शेळके (व्यवस्थेचा बइल, ग्रामीण कथासंग्रह), संदीप जगदाळे (असो आता चाड, ग्रामीण कविता संग्रह), बाळू दुगडुमवार (बाबा आमटे : व्यक्तित्त्व, कवित्व आणि कर्तृत्व, समीक्षा ग्रंथ) यांना प्रत्येकी भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराचे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व ११ हजार रुपये रोख असे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी प्रा. श्रीकांत बेडेकर, सुभाष महाजन, संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी यांच्यासह पुरस्कारप्राप्त कवी व लेखकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी रमेश रोहमारे, राहुल रोहमारे, संदीप रोहमारे, सुजित रोहमारे, ॲड. संजय भोकरे, चंद्रशेखर कुलकर्णी, सोमनाथ सोनपसारे, प्रा. सुभाष शिंदे उपस्थित होते. यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ. संतोष पगारे, प्रा. विजय ठाणगे, डॉ. एस. बी. दवंगे, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे आदी प्राध्यापकवृंद व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. शैलेंद्र बनसोडे, प्रा. मधुमिता निळेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
.........................
फोटो०८- रोहमारे पुरस्कार वितरण, कोपरगाव
081220\img-20201207-wa0003.jpg
कोपरगाव येथे राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.