ताकदीचा वापर चांगल्या कामासाठी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:36+5:302021-09-12T04:25:36+5:30
ब्राह्मणी येथे शनिवारी (दि.४) जीम साहित्य उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव मोकाटे होते. कार्यक्रमाचे ...

ताकदीचा वापर चांगल्या कामासाठी करा
ब्राह्मणी येथे शनिवारी (दि.४) जीम साहित्य उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव मोकाटे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र बानकर यांनी केले.
तनपुरे म्हणाले, रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांसह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. डीपीच्या उद्घाटनावरून विरोधक टीका करतात. शेवटी जे केले त्याचे उद्घाटन केले पाहिजे. त्यात गैर काय? अर्धवट काम पूर्ण केले. व्यायामशाळेचे अर्धवट काम पूर्ण झाल्याचे समाधान आहे.
यावेळी रंगनाथ मोकाटे, बाळासाहेब देशमुख, माणिक तारडे, भारत तारडे, प्रशांत शिंदे, शिवाजी राजदेव, विश्वनाथ हापसे, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, राष्ट्रीय कबड्डी पंच संकेत शिंदे उपस्थित होते. जिम साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल बजरंग फिटनेस क्लबच्या वतीने हराळे, कृष्णा धामणे, आकाश राजदेव, अजित वने, संकेत खुळे यांनी आमदार तनपुरे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी तर आभार सोमनाथ हापसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मल्ल विद्या महासंघाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ हापसे मित्र मंडळ व बजरंग फिटनेस क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.