शेवगाव शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर ; चार विक्रेत्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:24 IST2018-07-12T20:24:21+5:302018-07-12T20:24:52+5:30
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या शहरातील चार विक्रेत्यांवर नगर परिषदेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत विक्रेत्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.

शेवगाव शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर ; चार विक्रेत्यांना दंड
शेवगाव : प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या शहरातील चार विक्रेत्यांवर शेवगाव नगर परिषदेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत विक्रेत्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.
राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरु असल्याने मुख्याधिकारी गर्कळ यांनी पालिकेचे विशेष पथक नेमले. या पथकाने शहरात तपासणी व कारवाईला सुरुवात केली असून नगर रस्त्यावरील राजलक्ष्मी स्वीट्स होम, राजलक्ष्मी बेकरी, आंबेडकर चौकातील राजधानी स्वीट्स व आखेगाव रस्त्यावरील बापजी शॉपिंग मॉल येथे पथकाने केलेल्या कारवाईत प्लास्टिक पिशव्या, चमचे जप्त करून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेत मुख्याधिकारी गरकळ, लेखापाल सोमनाथ नारळकर, भारत चव्हाण, विशाल डहाळे, सिकंदर शेख, गोरक्ष काळे व इतर कर्मचारी सहभागी झाले. त्यानंतर शहरातील किराणा व्यावसायिकांनी मुख्याधिका-यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन प्लास्टिक वापराच्या नियमांची माहिती घेऊन पथकाला सहकार्य करण्याचे सूचित केले. किराणा व्यावसायिकांनी मायक्रो पिशव्यांची मागणी नोंदविली असून त्या पिशव्या उपलब्ध होताच त्याचा वापर सुरु करण्यात येईल. तोपर्यत पथकाला सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी केली.