अर्बन बँकेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:52+5:302021-07-28T04:22:52+5:30
शिंदे हे मंगळवारी दुपारी भातकुडगाव येथील त्यांच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत कुटुंबीयांना आढळून आले. त्यांना तत्काळ शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल ...

अर्बन बँकेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या
शिंदे हे मंगळवारी दुपारी भातकुडगाव येथील त्यांच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत कुटुंबीयांना आढळून आले. त्यांना तत्काळ शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांचे चुलत भाऊ कचरू शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. नातेवाइकांनी ही चिठ्ठी शेवगाव पोलिसांकडे दिली आहे.
बँकेच्या शेवगाव शाखेतील सोने तारणातील अपहार नुकताच उघडकीस आला आहे. सोने तारण कर्जापोटी बँकेत जे सोने तारण आहे, त्यातील ३६४ पैकी साडेतीनशेहून अधिक पिशव्यांतील सोने बनावट निघाले आहे. कर्जदारांनी बँकेत गहाण ठेवलेले हे सोने संशयास्पद असून, त्याची चाैकशी करावी असे पत्र गोरक्षनााथ शिंदे यांनी २०१८ मध्येच बँकेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. मात्र, या पत्रावर कार्यवाही झाली नाही. त्यातून हा घोटाळा वाढत गेल्याची चर्चा आहे.
..........
सोने तारण कर्जाच्या तणावातून आत्महत्या
गोरक्षनाथ शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या नातेवाइकांनी पाेलिसांकडे दिली आहे. ‘नगर अर्बन बँकेत सोन्याचे मूल्यांकन करणारे प्रतिनिधी (गोल्ड व्हॅल्युअर) व खातेदारांनी केलेल्या चुकांमुळे मला त्रास सहन करावा लागत आहे. सोने तारण ठेवताना खातेदार आणि व्ह्यॅल्युअर यांचा संबंध असतो. त्यात माझा काहीच संबंध नाही’. अशा स्वरूपाचा उल्लेख चिठ्ठीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सोने तारण कर्ज अपहरणाच्या तणावातूनच शिंदे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
----------------
अद्याप गुन्हा दाखल नाही
अर्बन बँकेतील सोने तारण अपहार समोर येऊन महिना उलटला तरीदेखील बँकेच्या अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत दोषींविरोधात पोलिसांत फिर्याद दिलेली नाही. रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेवर प्रशासक नियुक्त केला आहे. मात्र, प्रशासक कारवाई करताना दिसत नाही. याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.
.....................
फोटो- २७ गोरक्षनाथ शिंदे