शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाभाऊ साठे यांचे अप्रकाशित साहित्य जगासमोर येणार

By admin | Updated: August 2, 2014 00:40 IST

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर जलसे व शाहिरी परंपरेतून समाजाचे प्रबोधन करीत ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले भीमराव’

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरजलसे व शाहिरी परंपरेतून समाजाचे प्रबोधन करीत ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले भीमराव’ म्हणणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण वाङ्मय ग्रंथ स्वरुपात जगासमोर येणार आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांचे अप्रकाशित साहित्यही जगासमोर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर प्रकाशित केलेल्या ग्रंथांना महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने राज्य विधिमंडळाच्या सन २०१३ च्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत तारांकित प्रश्न (क्रमांक ११६१४९) उपस्थित झाला होता. त्यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊंचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी एक महिन्यात समिती गठीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यावर वर्षभराने या समितीचा मुहूर्त निघाला. त्यानुसार त्यांचे संपूर्ण वाङ्मय ग्रंथ स्वरुपात प्रकाशित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन समितीला १६ जून २०१४ रोजी मंजुरी देण्यात आली. समितीची मुदत ३ वर्षे आहे. १ संशोधन सहायक, २ लिपिक टंकलेखक व १ शिपाई नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अशी आहे प्रकाशन समितीउच्च व तंत्र शिक्षणमंत्री (अध्यक्ष), उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री (उपाध्यक्ष), पुण्याचे आमदार रमेश बागवे, जालन्याचे डॉ. दिलीप अर्जुने व उच्च शिक्षण संचालक समितीचे निमंत्रक आहेत. तर शिवाजी खंडू कांबळे (नांदेड), प्रा. राजेंद्र कुंभार (कोल्हापूर), प्रा. डॉ. संजय दासू शिंदे (औरंगाबाद),डॉ. माधव गादेकर (वडवणी, जि. बीड), डॉ. प्रमोद गारोडे (अमरावती), प्रा. डॉ. अश्रू जाधव (मांढळ, ता. कुही, नागपूर), प्रा. डॉ. बाबूराव अंभोरे (अमरावती), संचालक शासकीय मुद्रणालय व लेखनसामुग्री व प्रकाशन (सर्व सदस्य).समितीची कार्यकक्षासाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समग्र वाङ्मय प्रसिद्ध करुन त्याचे हिंदी, इंग्रजी आदी भाषांमध्ये प्रकाशित करणे. अण्णाभाऊंचे अद्ययावत व सप्रमाण चरित्र लिहून त्याचे हिंदी, इंग्रजी आदी भाषांमध्ये भाषांतर करणे व प्रसिद्ध करणे. त्यांच्या जीवन कार्यावरील तसेच समीक्षापर साहित्य प्रकाशित करणे. त्यांच्या अप्रकाशित साहित्याचे संकलन व संपादन करणे. त्यांच्या प्रकाशित साहित्याचे संशोधन करणे.