बोधेगावच्या पशुपालक मंडळाची सहलीद्वारे विद्यापीठवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:42+5:302021-03-21T04:20:42+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पशुपालक मंडळाने शनिवारी सकाळी राहुरी कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागास सहलीद्वारे भेट ...

बोधेगावच्या पशुपालक मंडळाची सहलीद्वारे विद्यापीठवारी
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पशुपालक मंडळाने शनिवारी सकाळी राहुरी कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागास सहलीद्वारे भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली.
कामधेनू दत्तकग्राम योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्धविकास संशोधन विभागास भेट देण्यात आली. या ठिकाणी विद्यापीठाने गीर, जर्सी व होस्टेनपासून निर्मिती केलेल्या फुले त्रिवेणी संकरीत गायींचा गो संशोधन व विकास प्रकल्प, मुक्तगोठा पद्धती, शेण व पाला-पाचोळा यांपासून तयार होणारा गांडूळखत प्रकल्प, मूर घास प्रकल्प, संगमनेरी व उस्मानाबादी शेळीपालन प्रकल्प, चारा पद्धती आदींसह इतर पशुसंवर्धन प्रकल्पांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. विद्यापीठातील इतर विभागांना भेटी दिल्या.
यावेळी सहाय्यक व्यवस्थापक एस. ए. पाटील यांनी प्रकल्पाची माहिती दिली. या मंडळामध्ये बोधेगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. अमोल जाधव, गोपालक तथा उपसरपंच नितीन काकडे, धोंडीराम महाराज घोरतळे, दादा काशिद, बाळासाहेब अकोलकर, प्रगतशील शेतकरी नारायण काशिद, मयूर हुंडेकरी, सुनील काशिद, प्रकाश गर्जे, भैय्या गरड, बबन कुरेशी, संजय सुपेकर, खासगी पशुवैद्य डाॅ. दिनेश बटुळे आदींसह पशुपालक शेतकऱ्यांचा समावेश होता.