ग्रामीण भागाच्या विकासासाठी एकजूट महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:32+5:302021-01-03T04:21:32+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशन व तालुका मेडिकल असोसिएशन व गुरुनानक फाऊंडेशन श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पद्मश्री डॉ. कोल्हे बोलत ...

ग्रामीण भागाच्या विकासासाठी एकजूट महत्त्वाची
इंडियन मेडिकल असोसिएशन व तालुका मेडिकल असोसिएशन व गुरुनानक फाऊंडेशन श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पद्मश्री डॉ. कोल्हे बोलत होते. व्यासपीठावर इंडियन मेडिकल असोसिएशन श्रीरामपूरचे शाखाध्यक्ष डॉ. मनोज संचेती, राज्य उपाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, तालुका मेडिकल असोसिएशच्या डॉ. कमजित कौर बत्रा, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. संजय शेळके, डॉ. सचिन पऱ्हे, डॉ. संकेत मुंदडा उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, ग्रामीण भागात डॉक्टरांनी सेवा दिली पाहिजे. डॉक्टर व रुग्ण यांच्यामध्ये संवाद राखून कौटुंबिक नात्याच्या माध्यमातून सेवा द्यावी व उपचार करावेत. सूत्रसंचालन डॉ. सचिन पऱ्हे यांनी केले. तर डॉ. संकेत मुंदडा यांनी आभार मानले. गुरुनानक मिशनच्या संयोजक डॉ. कमलजित कौर बत्रा यांनी मिशनच्या कार्याची माहिती दिली.