अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:08+5:302020-12-07T04:15:08+5:30
सुपा : नगर-पुणे रस्त्यावरील वाघुंडे (ता. पारनेर) शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण जखमी झाला. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
सुपा : नगर-पुणे रस्त्यावरील वाघुंडे (ता. पारनेर) शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली.
आंतुश दशरथ चव्हाण (रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे) असे अपघातातील मयताचे नाव आहे. तर किशोर तुकाराम बर्डे (वय ३५, रा. पदमपूरवाडी, दरेवाडी, ता. नगर), असे जखमीचे नाव आहे.
आंतुश दशरथ चव्हाण, किशोर तुकाराम बर्डे हे दोघे दुचाकीवरून नगरहून पुण्याच्या दिशेने जात होते. आंतुश चव्हाण हा दुचाकी चालवत होता. शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास वाघुंडे शिवारात त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार आंतुश चव्हाण हा ठार झाला. तर किशोर बर्डे जखमी झाला. अपघाताचे वृत्त समजताच सुपा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सी. पी. कोसे व पोलीस नाईक के. एस. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. अपघातातील जखमी किशोर तुकाराम बर्डे यांनी याबाबत सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सहायक फौजदार आर. जे. साबळे करीत आहेत.