बोल्हेगावात अस्वच्छता
By | Updated: December 9, 2020 04:17 IST2020-12-09T04:17:04+5:302020-12-09T04:17:04+5:30
... दुभाजक उखडले अहमदनगर : नगर-पुणे महामार्गावरील दुभाजक ठिकठिकाणी उखडले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करण्यास टाळाटाळ केली जात ...

बोल्हेगावात अस्वच्छता
...
दुभाजक उखडले
अहमदनगर : नगर-पुणे महामार्गावरील दुभाजक ठिकठिकाणी उखडले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दुभाजक दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
...
भावीनिंबगाव रस्त्यात खड्डे
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी ते भावीनिंबगाव रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. रस्त्यात मोठमाेठे खड्डे पडले असून, या मार्गावरून वाहने चालविणे कठीण झाले आहे. त्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने या मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे.
...
नेवासा - शेवगाव रस्ता उखडला
अहमदनगर : जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेला नेवासा - शेवगाव रस्ता भातकुडगाव ते शेवगाव दरम्यान ठिकठिकाणी उखडला आहे. रस्त्यात अनेक मोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता असून, हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.