जामखेड येथील काकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:05 IST2018-02-03T22:05:02+5:302018-02-03T22:05:28+5:30

अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने फिरायला नेतो असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

The uncle at Jamkhed tortured a minor girl | जामखेड येथील काकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जामखेड येथील काकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जामखेड : अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने फिरायला नेतो असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी, की शनिवारी (दि. ३) बुरूडगल्लीत घरी दुपारी इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेली मुलगी रडत होती. रडण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले, की काका (वडिलांचा मावसभाऊ) राजकुमार रामप्रसाद शर्मा (रा.खंडोबावस्ती, जामखेड) दि.२० जानेवारी रोजी घरी असताना काकाने पीडित अल्पवयीन मुलीस लेहनवाडी येथे पवार काका यांच्याकडे फिरावयास मोटारसायकलवरून घेऊन जातो म्हणाला, पण तिकडे न जाता त्याने सौताडा (ता.पाटोदा जि. बीड) येथील वन विभागाच्या गार्डनमध्ये नेऊन झाडाच्या आडोशाला मुलीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. ३० जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता काका राजकुमार शर्मा घरी आला. त्याने तुझी काकी आजारी आहे. तिला दवाखान्यात न्यायचे आहे, तिच्याबरोबर दवाखान्यात जायचे म्हणून पीडित मुलीस त्याच्या घरी घेऊन गेला व जबरी अत्याचार करून सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी राजकुमार शर्मा यास शनिवारी सायंकाळी अटक केली आहे.

Web Title: The uncle at Jamkhed tortured a minor girl