श्रेयासाठी उजनी योजना प्रलंबित ठेवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:23 IST2021-09-11T04:23:12+5:302021-09-11T04:23:12+5:30
जामखेड : जामखेड शहरासाठी उजनी धरणातून येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींनी ती योजना दोन वर्षे प्रलंबित ठेवली, ...

श्रेयासाठी उजनी योजना प्रलंबित ठेवली
जामखेड : जामखेड शहरासाठी उजनी धरणातून येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींनी ती योजना दोन वर्षे प्रलंबित ठेवली, असा आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला. खर्डा किल्ल्याच्या विकासासाठी मंत्री असताना साडेसात कोटी रुपयांची योजना तयार केली होती. त्यावेळी ३ कोटी ८६ लाख रुपये मंजूर केलेली ही कामे करत असताना आमचे एकच चुकले आम्ही कामे केली; परंतु झेंडे लावले नाहीत? विद्यमान आमदार झेंडे लावायचे काम करतात. त्यांना शुभेच्छा. मात्र, या किल्ल्याचा विकासाचा रखडलेला निधी तातडीने आणावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरूमकर, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कारले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, सलीम बागवान, उद्धव हुलगुंडे, अप्पा ढगे आदी उपस्थित होते.