उद्धव सेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा, पोलिसांनी घेतले ताब्यात
By अण्णा नवथर | Updated: July 22, 2025 11:41 IST2025-07-22T11:41:03+5:302025-07-22T11:41:40+5:30
कामानिमित्त भेटण्यास आलेल्या विवाहितेवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा प्रकार सन २०२३ एप्रिल २४ या कालावधीत घडला.

उद्धव सेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा, पोलिसांनी घेतले ताब्यात
अहिल्यानगर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्या विरोधात विवाहितेवर अत्याचार केल्याचा गुन्हा सोमवारी रात्री उशिराने कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला. दरम्यान काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कामानिमित्त भेटण्यास आलेल्या विवाहितेवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा प्रकार सन २०२३ एप्रिल २४ या कालावधीत घडला. विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे. किरण काळे यांनी घरगुती त्रास बंद करून घरगुती खर्चासाठी मदत करतो, असे सांगून त्यांच्या कार्यालयात बोलावून घेत अत्याचार केला.
तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर काळे यांना कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री अटक केली, अशी माहिती कोतवाली पोलिसांनी दिली.