रस्ता अपघातात दोन युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST2021-02-21T04:40:59+5:302021-02-21T04:40:59+5:30

नेवासा फाटा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम गोदावरी पुलाजवळील जुन्या सलाबतपूर रस्त्यानजीक एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंगापूर ...

Two youths were killed on the spot in a road accident | रस्ता अपघातात दोन युवक जागीच ठार

रस्ता अपघातात दोन युवक जागीच ठार

नेवासा फाटा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम गोदावरी पुलाजवळील जुन्या सलाबतपूर रस्त्यानजीक एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

प्रदीप अण्णासाहेब पाडे (वय १९, रा. वडगाव कोल्हाटी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) व गोरख जगन्नाथ घोरपडे (वय १८, तिसगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत.

प्रदीप पाडे, गोरख घोरपडे हे दोघे दुचाकी (क्र. एम. एच. २० डी एन ३३५४) वरून प्रवास करत होते. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. त्यांचे शवविच्छेदन नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. पोलीस हवालदार कैलास साळवे, पोलीस नाईक अशोक नागरगोजे, केवलसिंग राजपूत यांनी रस्ता अपघाताचा पंचनामा केला. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two youths were killed on the spot in a road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.