देवदैठण येथे दोन वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 17:19 IST2020-07-22T17:19:14+5:302020-07-22T17:19:37+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे पूर्वीच्याच बाधित कुटुंबातील दोन वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाली असल्याचे बुधवारी(२२ जुलै) स्पष्ट झाले. 

Two-year-old baby infected with corona at Devdaithan | देवदैठण येथे दोन वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण

देवदैठण येथे दोन वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे पूर्वीच्याच बाधित कुटुंबातील दोन वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाली असल्याचे बुधवारी(२२ जुलै) स्पष्ट झाले. 

मंगळवारी (२१ जुलै) जे तीन बाधीत आढळले. त्यात या बाळाच्या आईचा देखील समावेश आहे. दरम्यान, कुटुंबातील इतर पाच सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

 श्रीगोंदा येथे तपासणी करून आल्यानंतर त्यांना देवदैठण येथील शाळेत सर्वांना क्वारंटाईन केले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपकेंद्र, दोन्ही बँका, ग्रामपंचायत कार्यालय येथे औषध फवारणी करण्यात आल्याची माहिती सरपंच जयश्री गुंजाळ, उपसरपंच पूजा बनकर यांनी दिली.

Web Title: Two-year-old baby infected with corona at Devdaithan