अपघातात दुचाकीस्वार ठार

By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:34+5:302020-12-06T04:21:34+5:30

-------- अपघातात तरुण जखमी श्रीरामपूर : श्रीरामपूर- नेवासा रस्त्यावर भोकर शिवारामध्ये (एमएच- १७, सीके- २४१५) या गाडीवरून नेवासा- श्रीरामपूर ...

Two-wheeler killed in accident | अपघातात दुचाकीस्वार ठार

अपघातात दुचाकीस्वार ठार

--------

अपघातात तरुण जखमी

श्रीरामपूर : श्रीरामपूर- नेवासा रस्त्यावर भोकर शिवारामध्ये (एमएच- १७, सीके- २४१५) या गाडीवरून नेवासा- श्रीरामपूर रस्त्याने जात असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस पाठीमागून धडक देऊन उडविले. दुचाकीस्वार मनोज दत्तात्रय रायपल्ली हा तरुण जखमी झाला. मनोज रायपल्ली यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------

सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी

श्रीरामपूर : केंद्र शासनाने घरगुती गॅस सिलिंडरचे भाव ५० रुपयांनी वाढविले आहेत. वाढलेली दरवाढ त्वरित मागे घेऊन सामान्य गॅसधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सिंधी समाज, श्रीरामपूरचे कार्यकर्त्यांनी केली आहे.

घरगुती गॅसवरचे अनुदान केंद्र सरकारने बंद केले आहे. तसेच महावितरणनेही वीज दरवाढ केल्यामुळे गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. त्यामुळे दैनंदिन प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची केलेली दरवाढ व महाराष्ट्र शासनाने वाढविलेले वीज बिल कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी सिंधी समाजाचे कार्यकर्ते रवी गरेला, किशोर छतवाणी, बबलू आहुजा, बबलू सिंधवाणी, जवाहर कुकरेजा, गुरुमुखलाल रामनानी, अनिल लुल्ला, संतोष बत्रा, लखन भागवाणी, आशिष बठेजा, अशोक भागवाणी, दीपक वलेशा, संजय माखिजा, मनोहरलाल बठेजा, प्रेम तलरेजा, हितेश चुग, संतोष गरेला, रवींद्र चुग, गिरीश बत्रा, रवी भागवाणी, रवींद्र तलरेजा, जयराम व हिरालाल तलरेजा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

-------

८ हजार ७९७ कांदा गोण्यांची आवक

श्रीरामपूर : बाजार समितीच्या मुख्य बाजारातील कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी ८ हजार ७९७ कांदा गोणीची आवक झाली. प्रथम प्रतीचा कांदा १ हजार ५०० ते २ हजार ४००, दुय्यम १ हजार ६०० ते ८००, तृतीय ४०० ते १ हजार ७५० व गोल्टी कांदा ९०० ते १ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल विकला गेला. टाकळीभान उपबाजारातही कांद्याची आवक घटून भावही कमी निघाले. प्रथम प्रतीचा कांदा १ हजार ५०० ते २ हजार १००, दुय्यम ९०० ते १ हजार ४५०, तृतीय ३०० ते ८५० व गोल्टी कांदा १४०० ते २ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल विकला गेला.

Web Title: Two-wheeler killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.