वाहनाच्या धडकेने दोन काळवीटाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 18:37 IST2019-02-26T18:37:21+5:302019-02-26T18:37:36+5:30
मिरजगाव-कर्जत रस्त्यावर गोंदर्डी फाट्यानजीक मंगळवारी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास वाहनाने धडक दिल्याने दोन नर जातीचे काळवीट जागीच ठार झाले.

वाहनाच्या धडकेने दोन काळवीटाचा मृत्यू
मिरजगाव : मिरजगाव-कर्जत रस्त्यावर गोंदर्डी फाट्यानजीक मंगळवारी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास वाहनाने धडक दिल्याने दोन नर जातीचे काळवीट जागीच ठार झाले.
पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ रेहकुरी अभयारण्यातील काळवीट मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असून डिकसळ जवळील पाझर तलावात काळवीट पाणी पिण्यासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे काळवीटाचा कळप पाण्याच्या ठिकाणाकडे जात असताना भरधाव वेगात असलेले अज्ञात वाहनकळपात घुसल्याने नरजातीचे दोन काळवीट जागीच ठार झाले. अपघातानंतर या वाहनाचा चालक वाहनासह फरार झाला. वन्यजीव विभागाच्या आधिका-याकडून अद्यापही पाणवठे तयार करण्यात आले नाहीत. काही ठिकाणी पुर्वीचे पाणवठे आहेत मात्र त्यातही नियमित पाणी सोडले जात नसल्याने ही काळवीटे पाण्याच्या शोधार्थ निघतात.