नगर-औरंगाबाद रोडवरील नेवासा फाट्यावर दोन वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 17:51 IST2020-02-16T17:50:22+5:302020-02-16T17:51:04+5:30
नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शेवगाव रोडवर रविवारी (दि.१६) दुपारी १२ वाजेपासून वाहतूक ठप्प झाली होती.

नगर-औरंगाबाद रोडवरील नेवासा फाट्यावर दोन वाहतूक ठप्प
भानसहिवरा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शेवगाव रोडवर रविवारी (दि.१६) दुपारी १२ वाजेपासून वाहतूक ठप्प झाली होती. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी आपल्या सहका-यांना बरोबर घेत दोन तास शर्थीचे प्रयत्न करीत वाहतूक सुरुळीत केली.
नेवासा येथील रविवारी आठवडाबाजार असतो. त्यात सुट्टीचा दिवस होता. विवाह मुहूर्त असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका, नवरदेव, व-हाडी मंडळी अडकून पडल्याचे चित्र होते. बेशिस्त वाहन चालकांमुळे कोंडीत भर पडत असल्यामुळे वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्याची खबर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना समजताच त्यांनी आपल्या सहका-यांसह दोन तास शर्थीने प्रयत्न करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. यावेळी सरपंच सतीश निंपुगे व त्यांच्या सहकारी मित्रांनी वाहतूक सुरळीत करण्याकामी पोलिसांना सहकार्य केले. वाहतूक सुरळीत होताच वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.