भंडारदऱ्यात दोन टीएमसी पाणी

By Admin | Updated: July 20, 2014 00:23 IST2014-07-19T23:41:56+5:302014-07-20T00:23:43+5:30

अकोले: सलग पाचव्या दिवशी घाटघर व हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस बरसत असून, शुक्रवारी रतनवाडी येथे साडेसात इंच पाऊस पडला.

Two TMC water in the reservoir | भंडारदऱ्यात दोन टीएमसी पाणी

भंडारदऱ्यात दोन टीएमसी पाणी

अकोले: सलग पाचव्या दिवशी घाटघर व हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस बरसत असून, शुक्रवारी रतनवाडी येथे साडेसात इंच पाऊस पडला. भंडारदरा धरणातील पाणी साठ्याने आता दोन दशलक्ष घनफुटाची पातळी ओलाडली आहे.
घाटघरला १००, तर रतनवाडीला १८० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत अर्धा टी.एम.सी. नव्या पाण्याची आवक भंडारदरा जलाशयात झाली आहे. पश्चिम आदिवासी भागात पावसाची संततधार सुरु असून पूर्व भागातही पावसाचा जोर वाढला आहे. भंडारदरा धरणात शुक्रवारी झालेल्या पावसाने २४ तासांत ५१३ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे.
शुक्रवारचा पाऊस व कंसात यावर्षी पडलेला एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये - घाटघर- १०० (९८९), रतनवाडी- १८० (८९९), पांजरे- ६९ (४४२), वाकी- ८५ (३०८), भंडारदरा- ७० (३३१), कोतूळ ६ (४४), निळवंडे- १० (५८), आढळा- २ (१२), अकोले- ३ (१०) पाऊस पडला. अकोले, इंदोरी परिसरात शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. भंडारदरा धरणात १ हजार ९८३, तर निळवंडेत ३३४ दलघफू साठा शुक्रवार सकाळीपर्यंत होता. आंबीत तलाव ओसंडून वाहत असून हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मुळानदी पात्रातून ४ हजार २२७ क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुळा’ चा साठा पाच हजारावर
मुळा पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्र गड परिसरात पाऊस कोसळत असल्याने दोन दिवसात मुळा धरणात आठशे दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणाचा एकूण साठा ५ हजार ७३१ दशलक्ष घनफूट झाला आहे.

Web Title: Two TMC water in the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.