साईनगरीत तरुणाचा खून करणाऱ्या दोघा संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 20:49 IST2020-06-13T20:48:23+5:302020-06-13T20:49:16+5:30
शिर्डी: येथील बस स्थानकासमोर व साईबाबा रूग्णालयाच्या लगत असलेल्या नगरपंचायतच्या सार्वजनिक शौचालयात विवस्त्र असलेल्या एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे़ यातील दोघा संशयितांना पोलिसांनी सायंकाळी अटक केली आहे. राजू माळी व सुनील तांबोरे असे आरोपीचे नाव असून उशिरापर्यंत त्यांनी मयताचे नाव सांगितले नव्हते.

साईनगरीत तरुणाचा खून करणाऱ्या दोघा संशयितांना अटक
शिर्डी: येथील बस स्थानकासमोर व साईबाबा रूग्णालयाच्या लगत असलेल्या नगरपंचायतच्या सार्वजनिक शौचालयात विवस्त्र असलेल्या एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे़ यातील दोघा संशयितांना पोलिसांनी सायंकाळी अटक केली आहे. राजू माळी व सुनील तांबोरे असे आरोपीचे नाव असून उशिरापर्यंत त्यांनी मयताचे नाव सांगितले नव्हते.
शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यातील मयत तरुणाचे वय पस्तीस होते़ शनिवारी सकाळी विवस्त्र अवस्थेत असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा चेहरा ओळखू येवू नये म्हणून दगडाने ठेचण्यात आला होता़ या घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दिपक गंधाले, मिथून घुगे, वाहतूक शाखेचे निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली़
मयत व्यक्ती बांधकाम मजूर असण्याच्या शक्यतेने या परिसरात नेहमी वावर असलेल्या बांधकाम कामगारांकडे सखोल चौकशी सुरू करण्यात आली़ याशिवाय परिसरातील सीसीटिव्ही फुटेजही तपासण्यात आले़ सायंकाळ पर्यंत मयत व्यक्तीची ओळख पटली नव्हती़