दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद,कोतवाली पोलिसांची कामगिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 18:44 IST2020-06-13T18:43:29+5:302020-06-13T18:44:50+5:30

अहमदनगर : अनेक गुन्ह्यांत समावेश असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात कोतवाली पोलिसांना शनिवारी यश आले. त्यांच्यावर नगरसह औरंगाबाद, बीड जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.

Two stalwart robbers arrested, performance of Kotwali police | दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद,कोतवाली पोलिसांची कामगिरी 

दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद,कोतवाली पोलिसांची कामगिरी 

अहमदनगर : अनेक गुन्ह्यांत समावेश असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात कोतवाली पोलिसांना शनिवारी यश आले. त्यांच्यावर नगरसह औरंगाबाद, बीड जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.
संतोष नंदू भोसले (वय १९) व काळू निलगिऱ्या भोसले (वय ३०, दोघे रा. वाळुंज पारगाव, ता. नगर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. चंदन इस्टेट (माणिक नगर) येथील बंद बंगल्यातून घरगुती साहित्य चोरी झाल्याची फिर्याद सुमित संतोष वर्मा यांनी २४ जून २०१९ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस त्या चोरीतील आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, याच चोरीतील हे आरोपी नगर-जामखेड रोडवरील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दि. १३ जून रोजी अंभोरा चेक पोस्टवर सापळा लावला. काही वेळाने हे दोघे आरोपी तेथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तसेच नगर शहरात इतर ठिकाणी गुन्हे केल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांच्यावर अंभोरा पोलीस ठाणे (ता. आष्टी), गंगापूर, पैठण (जि. औरंगाबाद) येथेही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
-------
 

Web Title: Two stalwart robbers arrested, performance of Kotwali police