दोन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST2021-06-19T04:15:32+5:302021-06-19T04:15:32+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील मुंढेकरवाडी येथे २०२० साली घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी दरोडेखोर व अट्टल मोटारसायकल चोर निमकर अर्जुन काळे ...

दोन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
श्रीगोंदा : तालुक्यातील मुंढेकरवाडी येथे २०२० साली घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी दरोडेखोर व अट्टल मोटारसायकल चोर निमकर अर्जुन काळे (वय २२, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) व त्याचा सहकारी अतुल उदाशा भोसले (वय २०, रा. कोळगाव, ता.श्रीगोंदा) यांना श्रीगोंदा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कोळगाव येथे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पकडले. त्यांच्याकडून निमगाव खलू, काष्टी येथून चोरीस गेलेली प्रत्येकी एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, गोकुळ इंगवले, अमोल कोतकर यांनी सहभाग घेतला. पुढील तपास संभाजी शिंदे करत आहेत.