नगरमध्ये सापडले आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 18:24 IST2020-03-29T18:23:30+5:302020-03-29T18:24:06+5:30
रविवारी (२९ मार्च) सकाळी येथील एक कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी जात नाही तोच नगरमध्ये आणखी दोघे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोघेही परदेशी नागरिक असून एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरीचा आहे.

नगरमध्ये सापडले आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण
अहमदनगर : रविवारी (२९ मार्च) सकाळी येथील एक कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी जात नाही तोच नगरमध्ये आणखी दोघे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोघेही परदेशी नागरिक असून एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरीचा आहे. या दोन परदेशी नागरिकांशी संबंधित ९ व्यक्तींनाही ताब्यात घेतले आहे. या सर्वांचे स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. याशिवाय त्यांच्या संपर्कातील आणखी व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे. हे दोन्ही नागरिक नगरला कामानिमित्त आले होते. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.