एकाच दिवशी दोन बिबट्यांचा मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 06:20 IST2022-09-23T06:20:08+5:302022-09-23T06:20:33+5:30
रायगव्हाण शिवारात राजेंद्र घेगडे यांच्या शेतात तापाने फणफणलेला बिबट्या बुधवारी संध्याकाळी दिसला.

एकाच दिवशी दोन बिबट्यांचा मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा (जि. अहमदनगर): तालुक्यात रायगव्हाण व येळपणे शिवारात गुरुवारी एकाच दिवशी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला. रायगव्हाण परिसरातील नागरिकांनी बिबट्या सोबत फोटोसेशन केले. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रायगव्हाण शिवारात राजेंद्र घेगडे यांच्या शेतात तापाने फणफणलेला बिबट्या बुधवारी संध्याकाळी दिसला. बिबट्याला बेलवंडी येथे नेले. पण तेथे बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्यास न्यूमोनिया झाला असावा, असा वैद्यकीय अहवाल आला आहे.
येळपणे शिवारात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. या बिबट्याच्या छातीला जखमा होत्या.