बंद घराचे कुलूप तोडून दोन लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:58+5:302021-04-18T04:19:58+5:30
कोपरगाव : शेतात वस्ती करून राहणारे शेतकरी दाम्पत्य शेतातील कामनिमित्त घराला कुलूप लावून शेतात गेले. याच संधीचा फायदा ...

बंद घराचे कुलूप तोडून दोन लाखांची चोरी
कोपरगाव : शेतात वस्ती करून राहणारे शेतकरी दाम्पत्य शेतातील कामनिमित्त घराला कुलूप लावून शेतात गेले. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात उचकपाच केली. कपाटातील सुमारे १ लाख ९८ हजार ७०० रुपयांचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, तसेच ६० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
ही घटना कोपरगाव तालुक्यातील वारी येथील जगताप वस्तीवर शुक्रवारी (दि.१७) सकाळी १० ते १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बाबासाहेब धोंडीराम जगताप, (वय ४९, रा.जगताप वस्ती, वारी शिवार, ता.कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.