दोन लाखांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 16:39 IST2017-09-01T16:39:29+5:302017-09-01T16:39:29+5:30

नगर शहरातून विनापरवाना दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़

 Two lakhs of alcohol was caught | दोन लाखांची दारू पकडली

दोन लाखांची दारू पकडली

ठळक मुद्दे कारसह चालक ताब्यात: दारू विकणारा फरार

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील मार्केट यार्ड चौकात कारमधून विनापरवाना नेण्यात येणारी २ लाख १४ हजार ९५० रुपयांची विदेशी दारू पकडली़ यावेळी इंडिका कारसह चालकास ताब्यात घेण्यात आले़ ही दारू विकणारा मुख्य आरोपी मात्र यावेळी फरार झाला़
नगर शहरातून विनापरवाना दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ पथकाने सापळा रचून नगर-पुणे रोडवरील मार्केट यार्ड चौकात संशयित इंडिका कारची तपासणी केली असता आतमध्ये विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले़ यावेळी सोमनाथ दत्तू गोरे (वय ३१ रा़ भांडेवाडी ता़ कर्जत) याला ताब्यात घेण्यात आले़ गोरे याला दारू देणारा विशाल सुरेश ठाणगे हा यावेळी फरार झाला़ ही दारू श्रीरामपूर येथून आणून गोरे याला विकली असल्याचा पोलिसांना संशय आहे़ या प्रकरणी दोघा आरोपींवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Two lakhs of alcohol was caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.