दुचाकी-टँकर अपघातात दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST2021-03-18T04:20:58+5:302021-03-18T04:20:58+5:30
कर्जत : कर्जत-राशीन रस्त्यावरील बेनवडी शिवारात दुचाकी आणि टँकरच्या अपघातात दोन जण र झाले. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या ...

दुचाकी-टँकर अपघातात दोघे ठार
कर्जत : कर्जत-राशीन रस्त्यावरील बेनवडी शिवारात दुचाकी आणि टँकरच्या अपघातात दोन जण र झाले. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. अपघातानंतर टँकर चालक पळून गेला. दोघेही मृत कर्जत तालुक्यातील चिलवडीचे आहेत.
अनिल माउलकर (वय ४३, रा. चिलवडी, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आजिनाथ भानुसार माउलकर (वय ३८) व प्रताप माेहन शिंदे (वय ३७, दोघेही रा. चिलवडी, ता. कर्जत), अशी मृतांची नावे आहेत.
आजिनाथ माउलकर, प्रताप शिंदे हे दोघे चिलवडीवरून बुधवारी सकाळी कर्जत येथे न्यायालयीन कामकाजासाठी आले होते. काम आटोपून दुपारी एकच्या सुमारास ते कर्जत-राशीन रस्त्याच्या दिशेने दुचाकीने (क्र. एमएच ४२ एबी ९८७६) चालले होते. बेनवडी शिवारात समोरून कर्जतकडे चाललेल्या भरधाव टँकरची (एमएच १२ एमएक्स १९५६) दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वृत्त समजताच ग्रामस्थांनी चिलवडी येथील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.
--
१७आजिनाथ माउलकर, १७प्रताप शिंदे