बेलवंडी रोडवरील दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 19:47 IST2017-11-22T19:47:08+5:302017-11-22T19:47:45+5:30
श्रीगोंदा : बेलवंडी हिंगणी व देवदैठण शिवारात झालेल्या दोन निरनिराळ्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हिंगणी गावातून कुकडी ...

बेलवंडी रोडवरील दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार
श्रीगोंदा : बेलवंडी हिंगणी व देवदैठण शिवारात झालेल्या दोन निरनिराळ्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.
हिंगणी गावातून कुकडी साखर कारखान्यावर उसाने भरलेला ट्रक बेलवंडी रोडवर आला असता ट्रक चालक राजेंद्र आनंदराव वाघचौरे (वय ४५) रिडीटरमध्ये पाणी भरत असताना समोरून आलेल्या पीकअपने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते जागीच ठार झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला.
दुसरा अपघात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास देवदैठण शिवारात झाला. एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलस्वार बाळू भरत रावडे (वय ४५, रा. कडूस, ता पारनेर) हा जागीच ठार झाला. बेलवंडी पोलीस ठाण्यात याबाबत दोन्ही वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.