लोणीव्यकनाथ शिवारात ट्रक धडकेने दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 13:01 IST2019-09-20T13:01:44+5:302019-09-20T13:01:53+5:30

नगर-दौंड रोडवर लोणीव्यंकनाथ शिवारात ट्रकखाली चिरडून सुनील तानाजी कासार (वय ४०, रा.वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर), मोहन बाबुराव सुलमाने (रा.गौतमनगर, श्रीरामपूर)  हे मोटारसायकलस्वार ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला.

Two killed in truck collision at Loniwaknath Shivar | लोणीव्यकनाथ शिवारात ट्रक धडकेने दोन ठार

लोणीव्यकनाथ शिवारात ट्रक धडकेने दोन ठार

श्रीगोंदा : नगर-दौंड रोडवर लोणीव्यंकनाथ शिवारात ट्रकखाली चिरडून सुनील तानाजी कासार (वय ४०, रा.वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर), मोहन बाबुराव सुलमाने (रा.गौतमनगर, श्रीरामपूर)  हे मोटारसायकलस्वार ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला.
  एम. एच.-१५, ए. के.७८९ हा ट्रक  नगरकडून बारामतीकडे जात होता. लोणीव्यंकनाथ शिवारातील लक्ष्मी मंगल कार्यालयासमोर  नगरकडे जाणारी  एम. एच.-१७, के-२२४८ ही  मोटारसायकल  ट्रकच्या मागील चाकाखाली गेली. मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. घटनास्थळास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस पाटील मनोज जगताप यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. 

Web Title: Two killed in truck collision at Loniwaknath Shivar