अपघातात २ ठार, २५ जखमी
By Admin | Updated: June 24, 2014 00:05 IST2014-06-23T23:47:30+5:302014-06-24T00:05:48+5:30
राहुरी : नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी फॅक्टरी नजीक आरामबस ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर २५ जण जखमी झाले़ जखमींवर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघातात २ ठार, २५ जखमी
राहुरी : नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी फॅक्टरी नजीक आरामबस ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर २५ जण जखमी झाले़ जखमींवर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
बसचालक मन्सूरखान शामीरखान पठाण (वय ५४, रा़ धुळे) व अजयसिंग पद्मासिंग गिरासे (२०, रा़ शिंदखेडा, जि.धुळे) यांचा मृतांत समावेश आहे़ श्रीनाथ ट्रॅव्हल्सची ही बस पुण्याकडे चालली होती. राहुरी फॅक्टरीनजीकच्या गणेगाव फाटा येथे बस आली असता रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या ट्रेलरवर धडकली़ धडकेत चालक व एक प्रवाशी जागीच ठार झाले, तर २५ जण जखमी झाले. जखमींना लोणी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले़
जखमींची नावे अशी : चेतन देशमुख (वय-२८, रा़ धुळे), सोन्या सय्यद (२४, रा़ भुसावळ), मिलिंद चौधरी (२१, रा़ तळोदा), दिलवर वळवी (२५, रा़नंदूरबार), पूनम बावीस्कर (२२, पुणे), गणेश माळी (२५, रा़ धुळे), अरूण पाटील (४५), सुप्रिया शिंपी (४५) सुनील शिंपी (२८, सर्व रा. पुणे), हिराबाई भुई (४८), मोहन भूई (४८), माधुरी भुई (२१), तुषार जावळे (१८) अश्विनी जावरे (१५), मयूर जावरे (१५) वैशाली जावरे (१३, सर्व रा. शाहदा), ज्योती ठाकरे (२७, शिंदखेडा), निलेश पाटील (२७, धुळे), किरण पवार (साक्री), मनोज पाटील (चोपडा), विजय बोडसे, जिजाऊ बोडसे, हेमंत शुक्ला, अशोक बोडसे (सर्व रा. कांगणी).
लोणी येथे जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आऱ एस़ चव्हाण यांनी दिली़ अपघातानंतर ट्रेलरचा चालक पळून गेला. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)