नगर-सोलापूर महामार्गावर साईभक्तांच्या जीपचा अपघात : दोन ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:14 IST2019-01-15T13:14:49+5:302019-01-15T13:14:58+5:30

नगर- सोलापूर महामार्गावर मांदळीनजीक रायकरवस्तीजवळ मंगळवारी पहाटे कारच्या सुमारास जीप व कन्टेनर यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला.

Two jawans and five injured in road accidents in Nagar-Solapur highway | नगर-सोलापूर महामार्गावर साईभक्तांच्या जीपचा अपघात : दोन ठार, पाच जखमी

नगर-सोलापूर महामार्गावर साईभक्तांच्या जीपचा अपघात : दोन ठार, पाच जखमी

मिरजगाव : नगर- सोलापूर महामार्गावर मांदळीनजीक रायकरवस्तीजवळ मंगळवारी पहाटे कारच्या सुमारास जीप व कन्टेनर यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये झालेल्या अपघातात दोन साईभक्त जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले.
शिर्डीकडे देवदर्शनसाठी निघालेल्या कर्नाटक मधील बालकुट जिल्ह्यातील भाविकांवर आज पहाटे काळाने घाला घातला. याभीषण अपघातामध्ये गोविदंराज एच बन्डी (वय-30 व अन्नपूर्णा), ए.पाटील (वय- 40) हे जागीच ठार झाले. लक्ष्मी देसाई, शिल्पा बी.मठ, शिवय्या बी.मठ, विक्रमा बी.मठ, अरूणकुमार एस. हिरामीठ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. अपघात भिषण असल्यामुळे महिंद्रा टीयुव्ही या जीपच्या समोरील दोन्ही एअरबॅग फुटून बाहेर आल्या. अडकलेले मृत्यूदेह काढण्यास तीन तास लागले.

 

Web Title: Two jawans and five injured in road accidents in Nagar-Solapur highway