अहमदनगरमध्ये कुरिअर पार्सल बॉक्सचा स्फोट, दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 09:25 IST2018-03-21T09:23:45+5:302018-03-21T09:25:04+5:30
कुरिअर पार्सलच्या बॉक्समध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

अहमदनगरमध्ये कुरिअर पार्सल बॉक्सचा स्फोट, दोन जण गंभीर जखमी
अहमदनगर - कुरिअर पार्सलच्या बॉक्समध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील माळीवाडा येथील मारुती कुरिअर कंपनीमध्ये ही घटना आहे. मंगळवारी (20 मार्च) रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस व बॉम्बशोधक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले व तपासणी सुरू करण्यात आली. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी कुरिअर ऑफिसमध्ये एकूण 3 जण काम करत होते. या दुर्घटनेत संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर जखमी झाले आहेत.
दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, स्फोट झालेलं पार्सल अहमदनगरवरुन पुण्याच्या पत्त्यावर पाठवलं जात होतं. मात्र पाठवणाऱ्याचा पत्ता बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पार्सल पाठवून समोरच्या व्यक्तीच्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी एटीएसचं पथकही तपासणीसाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.