कुकाण्यात दोन तास रस्त्यावरच धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:28 IST2021-09-10T04:28:34+5:302021-09-10T04:28:34+5:30

कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील अतिक्रमणाच्या वादावरून महिलेसह कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेवासा-शेवगाव ...

Two hours on the road in Kukana | कुकाण्यात दोन तास रस्त्यावरच धरणे

कुकाण्यात दोन तास रस्त्यावरच धरणे

कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील अतिक्रमणाच्या वादावरून महिलेसह कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेवासा-शेवगाव राज्यमार्गावर दोन तास रस्त्यावरच धरणे आंदोलन करण्यात आले.

वंचितचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सकाळी साडेदहाच्या सुमारास आंदोलन करण्यात आले. ज्या अतिक्रमणाच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला, तेथेच नेवासा-शेवगाव राज्य मार्गावर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत नेवासा पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी मनसेचे विलास देशमुख, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, रवी भालेराव, सुनील वाघमारे, रमेश गोर्डे, भाऊराव गोर्डे, कैलास पवार आदी उपस्थित होते.

कुकाणा येथे अतिक्रमणाच्या वादातून गोर्डे कुटुंबीयातील महिलेसह इतरांना बेदम मारहाण झाली. या घटनेचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असताना मारहाण करणाऱ्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

----

रास्ता रोकोप्रकरणी गुन्हा दाखल....

हरीशदादा चक्रनारायण (रा. नेवासा खुर्द), किसन चव्हाण (रा. शेवगाव), सुरेश अडागळे (रा. सौंदाळा, ता. नेवासा), प्यारेलाल शेख (रा. शेवगाव), विजय कचरे, विशाल इंगळे, विलास देशमुख,

अक्षय गोर्डे (रा. कुकाणा, ता. नेवासा), कैलास पवार (रा. वडुले, ता.नेवासा), विजय गायकवाड (रा. राहुरी), मुकेश मानकर (रा. गदेवाडी, ता. शेवगाव), भारू ऊर्फ रवींद्र म्हस्के (रा. कोरडगाव, ता. शेवगाव) व इतर ३० ते ४० यांच्यावर रास्ता रोको प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रताप दहिफळे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Two hours on the road in Kukana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.